
टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेज (टीसीएस) चे सीईओ के. कृतिवासन यांच्या वार्षिक पगारात 4.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे त्यांचा पगार आता 26.5 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. याआधी त्यांचा पगार 25.35 कोटी रुपये होता. सीईओसोबत टीसीएसच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातसुद्धा 4.5 टक्के ते 7 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. टीसीएसमधील कर्मचाऱ्यांच्या सरासरी तुलनेत सीईओ के. कृतिवासन यांचा पगार 329.9 पटीने वाढला आहे.