
टाटा इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठीचा अखेरचा लिलाव आता आजपासून दोन दिवस बंगुळुरूत पार पडणार आहे. या लिलावात अष्टपैलू शार्दूल ठाकूर आणि धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर यांच्यावर कोटी कोटी रुपयांची बोली लागणार असल्याचे बोलले जात आहे. या वर्षी टाटा आयपीएल लीगमध्ये दोन नव्या संघांसह एकूण 10 संघ खेळणार आहेत. त्यामुळे 2 दिवसांच्या लिलावात 500 क्रिकेटपटूंवर संघ बोली लावणार आहेत. त्यात 227 विदेशी क्रिकेटपटू आहेत. या वेळी संघांकडील लिलावाची उर्वरित रक्कम मोठी असल्याने अधिकाधिक क्रिकेटपटूंना 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत मिळणार आहे. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स हे दोन नवे संघ यंदाच्या टाटा आयपीएलमध्ये खेळणार आहेत.
शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यरवर लागणार 20 कोटींचा डाव
या वर्षी बहुतांश क्रिकेटपटूंवर 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक धनवर्षा होणार आहे. त्यात मुंबईचा अष्टपैलू क्रिकेटर शार्दूल ठाकूर आणि फलंदाज श्रेयस अय्यरवर 20 कोटी रुपयांपर्यंतची बोली लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन, फिरकीवीर युजवेंद्र चहल, दीपक चाहर यांनाही लिलावात 10 कोटी रुपयांहून अधिक किंमत मिळणार हे स्पष्ट आहे. महेंद्रसिंह धोनी (चेन्नई सुपर किंग्स), विराट कोहली (रॉयल चैलेंजर्स बंगुळुरू) आणि रोहित शर्मा (मुंबई इंडियन्स) या स्टार क्रिकेटपटूंना त्यांच्या संघांनी आपल्या चमूत कायम ठेवले आहे. आता या संघांची नजर मधल्या फळीतले प्रतिभावान फलंदाज आणि मनगटाने चेंडू वळवू शकतील,




























































