टाटा मोटर्स आता दोन कंपन्यांत विभागणार

टाटा मोटर्स आता दोन कंपन्यांमध्ये विभागली जाणार आहे. टाटा मोटर्सने मंगळवारी आपल्या शेअरधारकांना याची माहिती दिली आहे. या प्लानअंतर्गत टाटा पंपनीच्या दोन पंपन्या होणार आहेत. एक पंपनी प्रवासी वाहने, तर दुसरी कंपनी व्यावसायिक वाहने सांभाळेल. टाटा मोटर्सने मार्च 2024 मध्ये या विभागणीचा प्रस्ताव ठेवला होता. या विभागणीमुळे कंपनीला वेगळा पह्कस करता येईल. त्यामुळे पंपनीची भरभराट होईल. प्रवासी वाहनाच्या कंपनीत लग्झरी ब्रँड जग्वार लँड रोवरचा समावेश केला जाईल. या प्रस्तावाला शेअरधारकांच्या सर्वसंमतीने मंजुरी मिळाली आहे. विभागणीनंतर शेअरधारकांना दोन्ही कंपन्यांत बरोबरीची भागीदारी मिळेल.