
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिल्हयातील कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंद्रा-कळवा या विधानसभा क्षेत्राकरिता विद्यमान जिल्हासंघटक तात्यासाहेब माने यांची प्रभारी शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.




























































