पहिल्या सहामाहीत 607 कोटींचा कर तिजोरीत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने २०२५-२६ या आर्थिक वर्षांतील पहिल्या सहामाहीत ६०७ कोटींचा कर वसूल केला आहे. गतवर्षी सप्टेंबरअखेरपर्यंत ३ लाख ९० हजार मालमत्ताधारकांनी ५०५ कोटींचा कर भरणा केला होता, तर यंदा ४ लाख ७८ हजार २६८ मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. त्यामुळे गतवर्षापेक्षा यंदा १०२ कोटींचा अधिकचा करभरणा झाला आहे. दरवर्षीप्रमाणे ऑनलाईन माध्यमातून बिल भरण्यास नागरिकांनी मोठी पसंती दिली आहे.

गतवर्षपिक्षा महापालिकेकडे १०२ कोटींचा अधिक भरणा
त्याची मालमत्ता कराची रक्कम आणि सवलतीची रक्कम सांगणारा एसएमएस पाठवला जात होता. अशा विविध बाबींमुळे पहिल्या सहामाहीत कर भरणाऱ्यांचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात निवासी, औद्योगिक, बिगर निवासी, मिश्र, मोकळ्या जमीन अशा ७ लाख ३५ हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभाग कर वसूल करत आहे. यंदा महिला बचतगटांच्या माध्यमातून बिलांचे घरपोच वाटप, रिक्षाद्वारे जनजागृती, प्रत्येक व्यक्तीला विविध करसवलतींचा लाभ घेत सहा महिन्यांत कराचा भरणा केला आहे. या मालमत्ताधारकांनी तब्बल ६०६ कोटी ८२ लाख रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा केल्याचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.

आर्थिक वर्षासाठी १ हजार ५० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले आहे. पुढील सहा महिन्यांत तब्बल ४४३ कोटी रुपयांची वसुली करावी लागणार आहे. आगामी काळात महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे मालकत्ताकर वसुलीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बिगरनिवासी मालमत्तांचा शोध
शहरातील नोंद नसलेल्या निवासी व बिगरनिवासी मालमत्ता शोधण्यासाठी महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत ड्रोन सर्वेक्षण केले. त्या एजन्सीने अडीच लाखांपेक्षा अधिक नोंद नसलेल्या व वाढीव बांधकाम केलेल्या मालमत्तांचा शोध घेतला आहे. त्या मालमत्ताधारकांकडून मालमत्ताकर वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्ताकरात मोठी वाढ झाली आहे.

महापालिकेच्या करसंकलन विभागाला सन २०२५-२६ या महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने यंदा मालमत्ताकरांची बिले वाटप महिला बचतगटामार्फत करण्यात आले. महिलांनी शंभर टक्के बिलाचे वाटप केले. त्यामुळे नागरिकांनी पहिल्या सहामाहीत विविध कर सवलतींचा लाभ घेत कराचा भरणा केला आहे. या पुढील कालावधीत बड्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त