जगन रेड्डी यांनी त्यांच्या काकांची हत्या केली! चंद्राबाबू नायडूंच्या मुलानं केला गौप्यस्फोट

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा आणि तेलुगु देसम पक्षाचे राष्ट्रीय सचिव नारा लोकेश यांनी रविवारी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. जगन मोहन रेड्डी यांनी त्यांचे काका माजी राज्यमंत्री वायएस विवेकानंद रेड्डी यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात एका सभेत ते बोलत होते. जगन रेड्डी यांनी त्यांच्या काकांची हत्या केली. ते आणखी कुटुंबातील लोकांना मारण्यास तयार आहे का? मी जगन रेड्डी त्यांना विचारतो की, ते राज्याचा नाश करण्यास तयार आहेत का? पुढे नारा लोकेश यांनी आरोप केला की, जगन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली वायएसआरसीपी सरकारने त्यांचे वडील आणि तेलगू देसम पार्टीचे सुप्रिमो एन चंद्राबाबू नायडू यांना 53 दिवसांसाठी बेकायदेशीरपणे तुरुंगात डांबले होते. गेल्या चार वर्षांत तेलगू देसम पार्टीच्या कार्यकर्त्यांवर अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत, त्यातील माझ्यावर 22 केसेस आहेत. ज्यात हत्येचा प्रयत्न आणि अत्याचाराचा समावेश आहे. अधिकारी आणि व्हायएसआपसीपी नेत्यांनी जाणूनबुजून तेलगू देसमच्या नेत्यांना त्रास दिला आणि त्यांची नावे रेड बुकमध्ये नोंदवली गेल्याचे नारा लोकेश यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला म्हटले आहे. पुढे जगन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशला गांजाची राजधानी बनवल्याची टीका केली आहे. पुढे नारा लोकेश यांनी प्रश्न विचारला की, जगन रेड्डी यांना तुरुंगात पाठवायला लोक तयार आहेत का? अमरनाथ गौड सारख्या मागासवर्गीय मुलांना आणि डॉ सुधाकर सारख्या दलितांना मारायला जगन रेड्डी तयार आहेत का? असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला.

नुकत्याच तीन घटना घडल्या. त्यांनी विशाखापट्टणममधील तहसीलदार रामय्या यांची जमीन बळकावण्यास सहकार्य न केल्याने त्याची हत्या केली. त्यानंतर बापटला जिल्ह्यातील आरबीके केंद्रात कार्यरत असलेल्या कृषी सहाय्यक पूजिता यांनी आत्महत्या केली. केंद्रांमधून खतांची लूट केली, तेव्हा खतासाठी पैसे देण्यासाठी पूजाला भाग पाडण्यात आले आणि तिचा छळ करण्यात आला. अखेर तिने आत्महत्येचा पर्याय निवडला. त्यानंतर विझियानगरम जिल्ह्यातील पंचायत विभागात कार्यरत असलेले जेई रामकृष्ण यांनी पंख्याला लटकून आत्महत्या केली. वायएसआरसीपीच्या नेत्यांनी वाळू आणि लोखंडाच्या चोरीला विरोध केला तेव्हा त्यांनी त्याचा छळ केला आणि त्याला टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले,” असे नारा लोकेश पुढे म्हणाले. एवढेच नाही तर रेड्डी यांच्यावर तरुणांनी फसवणूकीचाही आरोप केला आहे. नारा लोकेश यांनी दावा केला की जगन रेड्डी यांनी गेल्या चार वर्षांत जिल्हा निवड समिती अधिसूचना जारी केली नाही. जगन रेड्डी यांनी 6,100 पदांसाठी जिल्हा निवड समिती अधिसूचना जारी करण्याचे आश्वासन देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. “टीडीपी सरकार स्थापन करेल आणि दरवर्षी जिल्हा निवड समिती परीक्षा घेईल,” नारा लोकेश पुढे म्हणाले.