
एका शिक्षिकेचा 17 वर्षाच्या विद्यार्थ्यावर जीव जडला. दोघांनीही आपले प्रेमप्रकरण मान्य केले असून पोलिसांनी शिक्षिकेला अटक केली आहे.
अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथे राहणाऱ्या एबी डिब्स (35) या शिक्षिकेचे तिच्या एका माजी विद्यार्थ्यावर प्रेम होते. या दोघांनी बऱ्याच वेळा अनैतिक संबंधही ठेवले होते. या माजी विद्यार्थ्याला या शिक्षिकेने विस्कॉन्सिन हायस्कूलमध्ये शिकवले होते. तिथेच त्यांचे प्रेम जुळले होते. याबाबात शाळेतील इतर शिक्षकांनीही तिच्याविरोधात विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याबाबत तक्रार केली होती.
पोलिसांनी अल्पवयीन मुलाबरोबर अनैतिक संबंध ठेवणाऱ्या या शिक्षिकेला अटक केली असून तिला कोलंबियातील काउंटी तुरुंगात ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्याशी अनैतिक संबंध ठेवल्याबाबत आरोपी शिक्षिकेला 12 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पोलीस प्रकरणाचा शोध घेत असून पीडित विद्यार्थ्याप्रमाणे अजून कोणी विद्यार्थी या शिक्षिकेच्या जाचाला बळी पडले आहे का? याचाही पोलीस शोध घेत आहेत.
शिक्षिका एबी डिब्सने तिचा गुन्हा मान्य केला असून विद्यार्थ्यासोबत अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवल्याचेही सांगितले आहे. तसेच माजी विद्यार्थ्याने त्याचे शिक्षिकेसोबत प्रेमप्रकरण असल्याचे मान्य केले आहे. तसेच एबी डिब्स आता पोर्टेज कम्युनिटी स्कूल डिस्ट्रिक्ट या शाळेत शिकवत नाही तसेच तिच्या शिक्षकी पेशापासून कशी दूर झाली याबाबत शाळेतील अधिकाऱ्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही.


























































