
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील सुमार 65 हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांनी राज्य सरकारविरोधात असहकार आंदोलन पुकारले असून आगामी विधानसभा निवडणूक कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या शिक्षकांनी घेतला आहे. कृती समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्यभरातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱयांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार असून शिक्षण विभागाकडून शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचाऱयांची माहिती मागकिण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र यामुळे शिक्षकवर्गात संतापाची लाट पसरली आहे. आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱया सरकारसाठी आम्ही काम का करायचे, असा सवाल महाराष्ट्र राज्य कायम किनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी केला आहे. अनुदानाच्या मागणीसाठी आतापर्यंत 152 आंदोलने करूनही सरकार मराठी व प्रादेशिक भाषेतील प्राथमिक, माध्यमिक क उच्च माध्यमिक शाळांना त्यांच्या हक्कानुसार अनुदान देऊ शकत नसेल तर मतदान प्रक्रियेत आम्हाला सहभागी व्हायचे नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.


























































