
ऑनलाईन बर्गर मागवताय तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एका महिलेने ऑनलाईन एग बर्गर ऑर्डर केला होता. बर्गरचा एक घास खाल्ल्यानंतर महिलेने बर्गर उघडून पाहिला असता तिला उल्टीच आली. त्याच्या आत असं काही होतं त्याने महिलेचा संताप अनावर झाला आणि महिलेने सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर केला.
द सनच्या वृत्तानुसार, किम किरखा असे त्या महिलेचे नाव असून ती शिक्षिका आहे. किमला प्रचंड भूक लागली असल्याने तिने एग बर्गर ऑनलाईन ऑर्डर केला होता. ऑर्डर आल्यानंतर तिने बर्गर खायला घेतला आणि एक बर्गर खाल्ल्यानंतर तिला त्याची चव थोडी वेगळी लागली म्हणून तिने बर्गर उघडून पाहिला. तर आतमधील अंड्याचा पिवळा भाग राखाडी होता त्याने तिने लगेच उल्टी केली. तिला ते पाहून किळस वाटली. संतापलेल्या महिलेने त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला.
तर महिलेच्या त्या आरोपावर ब्रॅण्डने खुलासा केला आहे. ब्रॅण्डच्या म्हणण्यानुसार बर्गर खराब नव्हता. त्यावर असलेल्या रसायनामुळे अंड्यातील बलक करड्या रंगाचे झाले होते. तिथेच, महिलेने सांगितले की एक घास खाल्ल्यानंतर अंड्याचा रंग करडा दिसला. त्यामुळे महिलेने उल्टी केली. तिने तत्काळ याची तक्रार त्या कंपनीला केली. महिलेने सांगितले की तिने बर्गर फेकून दिला. तेव्हा कंपनीने महिलेला रिप्लेसमेण्ट ऑफर दिली तेव्हा तिने नकार दिला. महिलेच्या म्हणण्यानुसार एकदा असा अनुभव आल्य़ानंतर पुन्हा त्या ब्रॅण्डकडून बर्गर खाण्याची इच्छा होणार नाही. म्हणून तिने रिप्लेसमेण्ट नाकारली.






















































