आज मोहरमच्या दिवशी शिक्षकांचा ‘मातम’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

गेल्या 35 दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. शिक्षकांवर झालेला अमानुष लाठीहल्ला तसेच शाळांना अनुदान देण्याचा अध्यादेश न काढणाऱ्या सरकारविरोधात मोहरमच्या निमित्ताने ‘मातम’ करण्यात येणार आहे.

चुकीच्या शैक्षणिक धोरणांविरोधात विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शिक्षक उद्या मंगळवारी दुपारी 12.30 वाजता आझाद मैदानात मातम पाळणार आहेत. राज्य सरकारने 100 टक्के अनुदान मिळण्यास पात्र असलेल्या शाळांची केवळ 20 टक्के अनुदानावर बोळवण केली आहे. त्यामुळे शिक्षकवर्गात संतापाची लाट पसरली असल्याचे विनाअनुदानित शाळा कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी सांगितले. सलग 35 दिवस आंदोलन करूनही शिक्षकांना हक्काचा पगार देऊ न शकणाऱ्या राज्य सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन करीत असल्याचे समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.