शिक्षकांचा सहावीतील मुलीवर लैंगिक अत्याचार, नांदेड पेटले; सर्वत्र कडकडीत बंद

1161
फोटो- प्रातिनिधीक

शंकरनगर येथील साईबाबा प्राथमिक विद्यालयात अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकांनीच लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी शंकरनगर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. बाजारपेठेसह शाळा व कॉलेजला देखील टाळे होते. निषेध सभेला उपस्थित महिलांनी आरोपी शिक्षकांच्या प्रतिमांना चपलांचा हार घातला. अत्याचारीत मुलीची प्रकृती गंभीर आहे.

साईबाबा प्राथमिक विद्यालयातील दयानंद राजुळे व सय्यद रसूल या दोन शिक्षकांनी 6 वीत शिकणाऱ्या रामतीर्थ येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर ऑक्टोबरपासून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. काही जागरुक कार्यकर्त्यांनी या घटनेला वाचा फोडली. शिक्षकांच्या दुष्कृत्याची माहिती मिळूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने मुख्याध्यापक प्रदीप पाटील, प्रा. धनंजय शेळके क स्वयंपाकी महिला सुरेखाबाई अशा एकूण पाच जणांविरुद्ध रामतीर्थ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

आपली प्रतिक्रिया द्या