INDvsAUS अखेरच्या दोन कसोटीतून विराट नाव मागे घेण्याची शक्यता, ‘हे’ आहे कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धा संपल्यानंतर हिंदुस्थानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला टी-20, एक दिवसीय आणि कसोटी मालिका खेळायची आहे. 4 कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील अखेरच्या 2 लढतीतून कर्णधार विराट कोहली माघार घेण्याची शक्यता आहे. कारण याच काळात तो पिता बनणार आहे. त्यामुळे कोहलीच्या जागी मधल्या क्रमाला बळकटी देण्यासाठी के.एल. राहुलला कसोटी संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

विराट कोहली याने यापूर्वीच अनुष्का जानेवारी महिन्यात आई होणार असल्याचे सांगितले होते. या दरम्यान टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. विराट-अनुष्काची आई-बाबा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे याचा आनंद लुटण्यासाठी विराट ऑस्ट्रेलिया दौरा सोडून मायदेशी परतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विराट कोहली याने याबाबत अद्याप कसलीही घोषणा केलेली नाही. मात्र बीसीसीआय सूत्राने विराट कोहली 17 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या या कसोटी मालिकेतील अखेरच्या दोन कसोतून माघार घेऊन पितृत्वाची रजा घेईल अशी शक्यता वर्तवली आहे. बीसीसीआयने नेहमीच खेळाडूंच्या कुटुंबाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे विराटने अशी मागणी केल्यास त्याला नक्कीच आराम देण्यात येईल, असेही बीसीसीआय सूत्रांनी सांगितले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळपत्रक –

एकदिवसीय मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर (सिडनी)
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर (सिडनी)
तिसरी वनडे – 1 डिसेंबर (ओव्हल)

टी-20 मालिका
पहिली T20 – 4 डिसेंबर (ओव्हल)
दुसरी T20 – 6 डिसेंबर (सिडनी)
तिसरी T20 – 8 डिसेंबर (सिडनी)

कसोटी मालिका
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर (अॅडलेड)
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर (मेलबर्न)
तिसरी टेस्ट – 7 ते 11 डिसेंबर (सिडनी)
चौथी टेस्ट – 15 ते 19 डिसेंबर (ब्रिस्बेन)