मॅच फिक्सिंगमध्ये अडकलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूची निवृत्ती

1497

मॅच फिक्सिंगचे आरोप असलेल्या टीम इंडियाच्या या खेळाडूने तब्बल 12 वर्षांनी निवृत्ती स्वीकारली आहे. दिनेश मोंगिया असे त्या फलंदाजाचे नाव असून त्याच्यावर न्यूझीलंडचा खेळाडू ल्यू विन्सेंटने मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता.

dinesh-mongia-new

दिनेश मोंगिया याने 2007 साली टीम इंडियासाठी अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर तो बीसीसीआयविरोधात बंड करून सुरू झालेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये (आयसीएल) सहभागी झाला होता. आयसीएलमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना बीसीसीआयने निलंबित केले होते. कालांतराने बीसीसीआयने त्या खेळाडूंचे निलंबन मागे घेतले. मात्र मोंगियावरील बंदी कायम ठेवली होती. 2015 साली न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ल्यू विन्सेंटने दिनेश मोंगिया व न्यूझीलंडचा फलंदाज ख्रिस क्रेन्स यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता. मात्र मोंगियाने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले होते.

2001 मध्ये पदार्पण केलेल्या दिनेश मोंगियाने 2003 चा विश्वचषकही खेळला होता. 57 एकदिवसीय सामन्यात त्याने 1230 धावा केल्या आहेत तर 14 विकेट घेतल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या