टीम इंडियाचा गोलंदाज मुकेश कुमारची विकेट पडली, दिव्या सिंहसोबत लग्नबंधनात अडकला

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारची (Mukesh Kumar) विकेट पडली आहे. मुकेश कुमार दिव्या सिंहसोबत (Divya Singh) लग्नबंधनात अडकला आहे. गोरखपूरमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेमध्ये मुकेश कुमार टीम इंडियाचा भाग आहे. पहिले दोन सामने खेळल्यानंतर मुकेश कुमार याने लग्नासाठी ब्रेक घेतला होता. 28 नोव्हेंबर रोजी गोरखपूरमध्ये त्याचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पाड पडला.

मुकेश कुमार हा बिहारमधील गोपालगंज येथील रहिवासी असून त्याची पत्नी दिव्या सिंह सारण जिल्ह्यातील बेऊरी गावची रहिवासी आहे. लग्नानंतर मुकेश कुमार पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथा टी-20 सामना खेळण्यासाठी रवाना झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिका सोडून मुकेश कुमार गोपालगंज येथे पोहोचला होता. 28 नोव्हेंबर रोजी त्याची वरात वडिलोपार्जित गाव काक्कड कुंड येथून गोरखपूरच्या दिशेने निघाली. येथे एका हॉटेलमध्ये मुकेश कुमार आणि दिव्या सिंह यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी मुकेश कुमार पुन्हा टीम इंडियाकडून खेळण्यासाठी रवाना झाला. ही मालिका संपल्यानंतर 4 डिसेंबर रोजी ते पुन्हा घरी येईल आणि त्यानंतर उर्वरित कार्यक्रम पार पडेल.