हिंदुस्थानी संघाचा आकड्यांचा खेळ, वाचा प्रत्येक वर्ल्डकपमधील खास बात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सामना ऑनलाइन । मुंबई
4 – वन-डे वर्ल्डकपमध्ये विजयाचे अर्धशतक साजरे करण्यासाठी हिंदुस्थानी संघाला आणखी 4 विजयांची आवश्यकता आहे. हिंदुस्थानने आतापर्यंत वन-डे वर्ल्डकपमधील 75 पैकी 46 सामने जिंकले असून 27 सामने गमावले आहेत. एक सामना ‘टाय’ झाला, तर एक सामना अनिर्णित राहिला.
413  – वन-डे वर्ल्डकपमधील हिंदुस्थानची सर्वोच्च धावसंख्या. हिंदुस्थानच्या 2007 वर्ल्डकपमध्ये बर्म्युडाविरुद्ध 5 बाद 413 धावा.
183 –  वन-डे वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानकडून सर्वोच्च खेळीचा विक्रम सौरभ गांगुलीच्या नावावर. सौरभने 1999 वर्ल्ड कपमध्ये 158 चेंडूंत 183 धावांची खेळी केली होती.
44  – वन-डे वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानकडून झहीर खानने सर्वाधिक 44 विकेट घेतल्या आहेत.
2278  – वन-डे वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर. सचिनने 45 सामन्यांत 56.95 च्या सरासरीने  6 शतके आणि 15 अर्धशतकांसह 2278 धावा केल्या आहेत.
257  – वन-डे वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानाचा मोठा विजय. गेल्या वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थान बर्म्युडाविरुद्ध 257 धावांनी विजयी.
125  – वन-डे वर्ल्डकपमधील हिंदुस्थानची नीचांकी धावसंख्या. 2003 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानला 125 धावांत गुंडाळले.
318  – वर्ल्डकपमध्ये हिंदुस्थानकडून सर्वोच्च भागीदारीचा विक्रम सौरभ गांगुली-राहुल द्रविड यांच्या नावावर. 1999 वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या विकेटसाठी 318 धावांची भागीदारी