
सामना ऑनलाईन । मुंबई
देशाच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बॉलिवूडचा दबंग सलमान खानने त्याचा आगामी चित्रपट ‘भारत’चा टिझर रिलीज केला आहे. सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हा टिझर रिलीज केला असून काही मिनिटातंच या टिझरला हजारो लाईक्स व रिट्विट मिळाले आहे.
Kuch Rishte Zameen se hote hai, Aur kuch Khoon se.. Mere Paas Dono Thee ! कुछ रिश्ते ज़मीन से होते है, और कुछ खून से.. मेरे पास दोनो थे !@Bharat_TheFilm @aliabbaszafar @atulreellife #KatrinaKaif #Tabu @DishPatani @WhoSunilGrover @norafatehi @nikhilnamit @reellifeprodn @tseries pic.twitter.com/myeyEpWdPx
— Salman Khan (@BeingSalmanKhan) August 15, 2018
सलमानने शेअर केलेल्या टिझरमध्ये फक्त ‘कुछ रिश्ते ज़मीन से होते है, और कुछ खून से.. मेरे पास दोनो थे!’ हा त्याचा एक डायलॉग ऐकायला मिळतो. या टिझरमध्ये एकही अभिनेता अभिनेत्री दाखवली नसून फक्त हिंदुस्थानचा नकाशा पाहायला मिळतो.
सलमान खानच्या भारत चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ, दिशा पटानी, नोरा फतेही, तबू, सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत. या चित्रपटात सर्वप्रथम कतरिनाच्या ऐवजी प्रियंका चोप्राला घेण्यात आले होते. मात्र प्रियंकाने चित्रपटातून माघार घेतल्याने तिच्या जागी कतरिनाची वर्णी लागली आहे. हा चित्रपट ५ जून २०१९ ला रिलीज होणार आहे.





























































