मावळा मशीनमध्ये तांत्रिक बिघाड; कोस्टल रोडच्या बोगद्याचे काम लांबणीवर 

मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पात बोगदा खोदणाऱया मावळा मशीनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे गिरगाव ते प्रियदर्शनी पार्क या 2 किलोमीटरच्या बोगद्याचे काम लांबणीवर पडणार आहे. हा दुसरा बोगदा मार्च महिन्याअखेरीला पूर्ण होणार होता, मात्र आता याची डेडलाइन हुकली असून त्यासाठी एप्रिल महिना उजाडणार आहे.

मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंकदरम्यान 10.58 किलोमीटरचा कोस्टल रोड बनवण्यात येत असून प्रकल्पाचे आतापर्यंत 72 टक्के काम पूर्ण झाले आहे.