इन्स्टाग्राम आता नव्या रूपात, फॉण्टपासून डिझाईनपर्यंत होणार बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात लोकप्रिय असलेल्या फोटो शेअरिंग ऍप ‘इन्स्टाग्राम’ने त्याच्या ब्रॅण्ड लोगोसह अनेक नवे बदल केले आहेत. इन्स्टाग्राममधील हे बदल त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित नसून रंग, फॉण्ट, टाइपफेस, डिझाईन यांसारख्या घटकांमध्ये आहेत.

नव्या बदलांमध्ये इन्स्टाग्राम ऍपच्या आयकॉनिक पोलरॉइड इंद्रधनुष्याला ताजा लुक देण्यात आला आहे. त्यामध्ये अनेक रंगछटा आहेत. फॉण्टच्या बाबतीत सांगायचे तर कंपनीने सध्याच्या फॉण्टमध्ये आणखी सुधारणा केली आहे. फॉण्ट हलके, नियमित, मध्यम आणि ठळक अशा वेगवेगळे प्रकारचे असतील. त्याशिवाय मेटा कंपनीने ग्लोबल कस्टम टाइपफेस तयार केला आहे. लेआऊट आणि ब्रॅण्ड रिसोर्सेजमधील डिझाईन बदलांसह मोबाईल ऍपसारखा अनुभव सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल, असे कंपनीने म्हटले आहे.

– जगभरात एक अब्जाहून अधिक लोक इन्स्टाग्राम ऍप वापरतात आणि युजर्स दररोज सरासरी 53 मिनिटे इन्स्टाग्रामवर आपला वेळ घालवतात. इन्स्टाग्राम ऍपचे बहुतेक युजर्स 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. तरुणांमध्ये हे ऍप लोकप्रिय आहे.