‘ही’ कंपनी देते Jio Fiber ला आव्हान; 100Mbps स्पीड आणि 1TB डेटाची ऑफर

मागील आठवड्यात प्रकाशाच्या वेगाइतका इंटरनेट स्पीड देणारी जिओ गिगा फायबर सेवा लॉन्च झाली आहे. जिओ गिगा फायबर लॉन्च झाल्यानंतर अनेक ब्रॉडबँड सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या डेटा प्लान मध्ये बदल केले आहेत. यामध्ये काही कंपन्यांनी जिओ गिगा फायबरपासून मिळणाऱ्या सेवेचे आव्हान पाहता आपल्या प्लानची किंमत कमी केली आहे. तर काहींनी आपल्या प्लान मध्ये ग्राहकांना अधिक डेटा ऑफर केला आहे. याच दरम्यान Railwire ने आपल्या SME (Small and Medium Sized Enterprises) च्यासाठी नवीन ब्रॉडबँड सेवेची घोषणा केली आहे. या सेवेत कंपनी ग्राहकांना 100Mbps वेगासह 1TB डेटा ऑफर करत आहे. सध्या ही सेवा काही निवडक शहरांमध्येच उपलब्ध आहे.

Railwire ने आपल्या सर्व ब्रॉडबँड प्लानच्या FUP (फेयर युजर पॉलिसी) लिमिटेड मध्ये वाढ केली आहे. आता ग्राहकांना 499 रुपयांच्या ब्रॉडबँड प्लानच्या व्यतिरिक्त प्रत्येक प्लान मध्ये अधिक डेटा मिळणार आहे. सध्या हा बदल फक्त केरळ टेलिकॉम सर्कलसाठी करण्यात आला आहे. कंपनी केरळमधील काही निडवक शहरांमध्ये FUP लिमिटसह डेटा ऑफर देत आहे.

Railwire ने 499 रुपयांपासून ते 1,299 रुपयापर्यंत ब्रॉडब्रँड सेवा ऑफर केली आहे. यामध्ये ग्राहकांना 10Mbps ते 200Mbps वेगाने डेटा ऑफर केला जात आहे. तसेच 799 रुपयांच्या प्लान मध्ये ग्राहकांना 40Mbps, 899 रुपयात 50Mbps, 949 रुपयात 100Mbps वेगाने डेटा ऑफर केला जात आहे.

कंपनी 599 रुपयांच्या प्लान मध्ये 10Mbps, 899 रुपयात 15Mbps, 1,399 रुपयात 20Mbps आणि 2,499 रुपयात 50Mbps वेगाने अनलिमिटेड डेटा ऑफर करत आहे. Railwire ची ही सेवा सध्या हिंदुस्थानातील २३ राज्यांमधील काही निवडक शहरांमध्ये सुरु आहे. कंपनी गुजरात, महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, कर्नाटक, केरळ मध्य प्रदेश, दिल्ली आणि गोवा या सारख्या राज्यांमध्ये सध्या ही सेवा पुरवत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या