गुगलपाठोपाठ ट्रु कॉलरचा मोठा निर्णय, 11 मेपासून कॉल रेकॉर्डिंग करणार बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुगलपाठोपाठ ट्रु कॉलरने येत्या 11 मेपासून कॉल रेकॉर्डिंग सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच गुगलने प्ले स्टोअर पॉलिसी अपडेट केली आहे. येत्या 11 मे पासून ही नवीन पॉलिसी लागू केली जाणार आहे. यामुळे थर्ड पार्टी ऍप्सना कॉल रेकॉर्डिंग करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे नाइलाजास्तक ट्रु कॉलरनेदेखील कॉल रेकॉर्डिंगचे फीचर हटवण्याची घोषणा केली आहे.