दात वेडेवाकडे आहेत म्हणून महिलेला तिहेरी तलाक

474

तिहेरी तलाकवर बंदी असूनही देशात असे प्रकार घडताना दिसत आहेत. कधी बायकोने डॉक्टरसाठी 30 रुपये मागितले म्हणून, कधी बायको मॉडर्न राहत नाही म्हणून तर कधी आणखी काहीतरी विचित्र आणि क्षुल्लक कारणांसाठी मुस्लीम महिला तिहेरी तलाकच्या शिकार होत आहेत. आता आणखी एक विचित्र आणि तितकंच संतापजनक कारण समोर आलं आहे.

हैदराबाद येथील एका महिलेला फक्त तिचे दात एका रेषेत नाहीत म्हणून तिच्या पतीने तिहेरी तलाक दिला आहे. रुक्साना बेगम असं या महिलेचं नाव आहे. तिचा विवाह मुस्तफा नावाच्या माणसाशी झाला होता. विवाहानंतर तो तिचा नेहमी छळ करत असे. तिचे दात एका रेषेत नाहीत, या तक्रारीवरून त्याने एक दिवस तिला तिहेरी तलाक दिला आणि घरातून निघून गेला.

महिलेने त्याच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न केला तेव्हा त्याने फोनवर आपल्यात आता कोणतंही नातं नसल्याचं तिला सांगितल. या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी या महिलेने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या