पत्नीच्या भयाने लालूपुत्र तेजप्रतापने बदलला आपला मतदारसंघ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सत्ताधारी आणि एनडीए आणि विरोधी आरजेडी यांच्यात विजयासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यातच आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांनी घर सोडलेल्या पत्नीच्या भयाने आपला मतदारसंघ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. तेजप्रताप यांनी आधी वैशाली जिह्यातील महुवा येथून विधानसभा निवडणूक लढविण्याचे ठरवले होते. पण आपली हकालपट्टी केलेली पत्नी ऐश्वर्या राय ही आपल्याविरुद्ध उभी राहील या भीतीने त्यांनी तेथून पळ काढला आहे. आता तेजप्रताप समस्तीपूर जिल्ह्यातील हसनपूर या यादवबहुल मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.