मेव्हणी पक्षात आली म्हणून ‘राजद’च्या स्थापना दिवसाकडे तेजप्रताप यांची पाठ

1184

राष्ट्रीय जनता दलाचा 24 वा स्थापना दिवस रविवारी बिहारमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्ताने काढण्यात आलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधातील सायकल यात्रेत राजद नेते तेजप्रताप यादव सहभागी झाले. मात्र पक्ष कार्यालयात आयोजित स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले नाहीत. यामागे मेव्हणी करिष्मा राय पक्षात आल्याने ते नाराज असल्याचे कारण सांगितले जात आहे.

राजद नेत्या बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानाहून निघालेल्या सायकल यात्रेत तेजप्रताप यादव भाऊ तेजस्वी यादव यांच्यासोबत सहभागी झाले. सायकल यात्रा संपल्यावर ते पक्ष कार्यालयात न जाता परत घरी निघून गेले. तेजप्रताप आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटप्रकरणी न्यायालयात खटला सुरू आहे. त्यात पत्नी ऐश्वर्या हिची चुलत बहीण करिष्मा राय पक्षात आल्याने ते नाराज आहेत. त्यामुळे ते पक्ष कार्यालयातील कार्यक्रमात सहभागी झाले नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, राजद नेता तेजस्वी यादव यांनी पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना व्यक्तिगत हित सोडून पार्टीचा विचार करा असा सल्ला दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या