
मध्य रेल्वेने कोकण मार्गावर प्रवाशांची मागणी पाहून 20 डिसेंबरपासून सीएसएमटी ते करमाळी ‘तेजस एक्स्प्रेस’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष ट्रेन सोमवार व गुरुवार वगळता आठवडय़ातून पाच दिवस धावणार आहे. याशिवाय सीएसएमटी ते मंगळुरू जंक्शन दैनिक सुपरफास्ट विशेष ट्रेन चालविण्याचाही निर्णय घेतला आहे.
ट्रेन क्र. 02119 : सुपरफास्ट (तेजस) विशेष दि. 20 डिसेंबर 2020पासून (सोमवार आणि गुरुवार वगळता आठवडय़ातून 5 दिवस) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून पहाटे 5.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी करमाळी येथे दुपारी 2.00 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्र. 02120 : सुपरफास्ट (तेजस) परतीची विशेष ट्रेन 20 डिसेंबर 2020पासून (सोमवार आणि गुरुवार वगळता आठवडय़ातून 5 दिवस) करमाळी येथून दुपारी 2.40 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे रा. 11.15 वाजता पोहोचेल.
थांबे : दादर, ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी आणि पुडाळ
डब्यांची रचना : 1 प्रथम श्रेणी वातानुपूलित चेअर कार, 12 वातानुपूलित चेअर कार.
- मुंबई-मंगळुरू जं. सुपरफास्ट विशेष (दैनिक)
ट्रेन क्र. 01133 : सुपरफास्ट विशेष 20 डिसेंबर 2020पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दररोज रा. 10.02 वाजता सुटेल आणि मंगळुरू जंक्शनला दुसऱया दिवशी दुपारी 1.05 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्र. 01134 : ही परतीची सुपरफास्ट विशेष 21 डिसेंबर 2020पासून मंगळुरू जंक्शन येथून दररोज दुपारी 2.00 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱया दिवशी पहाटे 4.35 वाजता पोहोचेल.
थांबे : ठाणे, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, मडगाव, कारवार, पुमटा, भटकळ, मुकांबिका रोड बेंदूर, पुंडापुरा, उडुपी आणि सुरथकल.





























































