तेजसमधल्या ‘टारगट’ प्रवाशांमुळे रेल्वे सुंदरी हैराण

1953

विमानसेवेप्रमाणेच प्रवाशांना रेल्वेसेवा मिळावी या धर्तीवर रेल्वेने तेजस रेल्वेत रेल्वे सुंदरीची नेमणूक केली. यामुळे प्रवाशांना सुखद धक्का बसला खरा. पण काही टारगट प्रवासी अंगलट करत या सुंदरीबरोबर सेल्फी आणि फोटो काढण्याचा हट्ट करत आहे. यामुळे सुंदरी हैराण झाल्या आहेत. पण नोकरी टिकवण्यासाठी या सुंदरींना नाईलाजाने चेहऱ्यावर स्मितहास्य आणत प्रवाशांचे स्वागत करावे लागत आहे.

tejan-comm

नवी दिल्लीतील प्लॅटफॉर्म 9 वरुन लखनौला जाणाऱ्या तेजसच्या दहा डब्यात 20 रेल्वे सुंदरीची नेमणूक करण्यात आली आहे. स्मितहास्याने प्रवाशांचे स्वागत करणे. त्यांना काय हवे नको ते पाहणे. अशी जबाबदारी या सुंदरीना देण्यात आली आहे. पण तेजस ही देशातील पहिली अशी रेल्वे आहे ज्यात प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वे सुंदरी तैनात करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना त्याचे अप्रूप आहे.याच अप्रूपतेमधून काही टारगट प्रवासी या सुंदरीबरोबर सेल्फी किंवा फोटो काढण्याचे सांगत त्यांच्याशी अंगलट करत आहेत. काळ्या पिवळ्या तंग ड्रेस घातलेल्या या सुंदरींची नेमणूक भारतीय रेल्वेची खासगी कंपनी असलेल्या आयआरसीटीसीने केली आहे. या सगळ्या रेल्वे सुंदरींनी लखनौमधील एविएशन हॉस्पीटेलिटी आणि कस्टमर सर्विस इन्स्टीट्यूटमधून प्रशिक्षण घेतले असून त्या कंत्राटावर काम करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या