हिंदूंना संपवण्याची भाषा करणाऱ्यांसमोर शपथ घेणार नाही, राजा सिंह यांचा एल्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

‘हिंदूंना संपवण्याची भाषा करणाऱ्या एमआयएमच्या स्पीकरसमोर शपथ घेणार नाही’, असा एल्गार तेलंगानाचे भाजप आमदार राजा सिंह ठाकूर यांनी केला आहे.

तेलंगानामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोशामहल येथून राजा सिंह हे विजयी झाले. या निवडणुकीत एमआयएमला चांगले यश मिळाल्यानंतर आमदार मुमताज खान यांची विधानसभा स्पिकर म्हणून निवड करण्यात आली. यानंतर राजा सिंह यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी तेलंगानाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपला निर्णय बदलावा अशीही मागणी केली आहे. यानंतर जो स्पीकर म्हणून पदभार स्वीकारेल त्यासमोर जाऊन मी शपथ घेईल असे राजा सिंह यांनी स्पष्ट केले.

राजा सिंह यांनी म्हटले की, तेलंगानाच्या मुख्यमंत्र्यांनी जे निजामाचे पाठिराखे आहेत, त्यापैकी एक एमआयएमच्या आमदाराला तीन दिवसांसाठी विधानसभेचा स्पीकर म्हणून निवडले आहे आणि त्यांच्यासमोरच सर्व आमदारांना शपथ घ्यावी लागणार आहे. हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असला तरी मी राजा सिंह शपथ घेणार नाही. ज्या पार्टीचे लोक हिंदुंना संपवण्याची भाषा करतात, हिंदुस्थानमध्ये युद्धाची भाषा करतात, वंदे मातरम् गाण्यास नकार देतात, भारत माता की जय ही घोषणा देण्यास नकार देतात अशा घाणा पक्षाच्या आमदारासमोर मी शपथ घेणार नाही. तसेच एमआयएम तेलंगानाचा विकास कधीही करू शकणार नाही, असेही राजा सिंह यावेळी म्हणाले.