
व्हॉट्सअॅप आणि झूमला टक्कर देण्यासाठी टेलिग्रामने जबरदस्त फीचर लाँच केले आहेत. कंपनीने आता आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर जोडलं आहे. ज्यात ते ग्रुप चॅट्सना व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलमध्ये कन्व्हर्ट करू शकतात. टेलिग्रामचे हे अपडेट अँड्रॉईड आणि आयओएस अॅपसाठी लाँच झाले आहेत. टेलिग्रामवरून आता एकाच वेळी 30 जणांना व्हिडियो कॉल करता येणार आहे.
परंतु ही लिमीट वाढवली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. व्हिडीओ कॉल सुरू असताना एखाद्या सहभागी व्यक्तीच्या स्क्रीन बॉक्सवर टॅप करून त्याला फूल स्क्रीन करणेदेखील शक्य आहे. विशिष्ट युझरला पिन करणेही शक्य होणार आहे.



























































