टेलिग्रामची एन्क्रिप्टेड ग्रुप व्हिडीओ कॉलिंग सुविधा

टेलिग्रामने आता एन्क्रिप्टेड ग्रुप व्हिडीओ कॉलिंग सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा फ्री असून एकाच वेळी 200 युजर्स ग्रुप व्हिडीओ कॉलिंगमध्ये एकत्र येऊ शकतात. टेलिग्रामच्या नव्या फीचरमुळे आता थेट गुगल मीट आणि मायक्रोसॉफ्ट टीम्ससारख्या सेवेला थेट टक्कर मिळेल. टेलिग्रामने याआधी 2021 मध्ये ग्रुप कॉलिंगची सुविधा सुरू केली होती. आता यात नवीन आणि दमदार अपडेट जोडले आहे. या सेवेत एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आहे. म्हणजेच संपूर्ण चर्चा खासगी राहील. ही व्हिडीओ कॉलिंग सेवा एक सदस्यापासून सुरू होऊन बाकीच्या सदस्यांना लिंक किंवा क्यूआर कोडद्वारे जोडले जाऊ शकते. कॉलिंगदरम्यान ऑडियो, व्हिडीओसोबत स्क्रीन शेयरिंगचा ऑप्शन उपलब्ध आहे. यामुळे मीटिंग्स आणि प्रेझेंटेशन आणखी सोपे होते.