शूटींगवरून परतणाऱ्या दोन अभिनेत्रींचा कार अपघातात मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । हैदराबाद

शूटींगवरून परतणाऱ्या अभिनेत्रींच्या गाडीला अपघात झाला असून या अपघातात दोन अभिनेत्रींचा जागीच मृत्यू झाला आहे. भार्गवी (20) व अनुषा रेड्डी अशी त्या अभिनेत्रींची नावे असून त्या तेलुगू मालिकांमध्ये काम करतात. या अपघातात कार चालकासह आणखी दोन अभिनेत्री जखमी झाल्या आहेत.

bhargavi-and-anusha-1

भार्गवी व अनुषा या दोघी सध्या मुत्यला मुग्गू या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका करत होत्या. या मालिकेचे शूटींग विक्रमगड येथील अनंतगिरी जंगलात होते. मंगळवारी शूटींग आटपून त्यांच्या हैदराबाद येथील घरी चालल्या होत्या. त्यावेळी गुडा भागात त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात भार्गवी व अनुषा यांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोन अभिनेत्री व ड्रायव्हर गंभीर जखमी असून त्यांच्यावर ओस्मानिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत.