टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाने जाहीर केली निवृत्ती, ट्विटरवर शेअर केली पोस्ट

टीम इंडियाचा एकेकाळचा वेगवान गोलंदाज विनय कुमार याने आज निवृत्तीची घोषणा केली. विनय कुमार याने 2013 साली टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. विनयने ट्विटरवरून एक पत्रक शेअर करत त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. मूळचा कर्नाटकचा खेळाडू असलेला विनय कुमार टीम इंडियासाठी तीनही प्रकारासाठी खेळला आहे.

विनय कुमार याने टीम इंडियासाठी एक कसोटी, नऊ टी-20 व 31 एकदिवसीय सामने खेळले आहेत. बंगळुरूमध्ये 2013 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला गेलेला सामना विनय कुमारचा शेवटचा सामना ठरला. या सामन्यात त्याने फार वाईट कामगिरी केली होती. त्याने 9 षटकात फक्त एक विकेट घेतल तब्बल 102 धावा दिल्या होत्या. त्याच सामन्यात रोहीत शर्माने डबल सेंच्युरी केली होती. मात्र त्याच्या डबल सेंच्युरीचा काहीही फायदा झाला नाही व टीम इंडिया तो सामना हरली.

vinay-kumar-new

विनय कुमारने 31 एकदिवसीय सामन्यात 37.44 च्या सरासरीने 38 विकेट घेतल्या आहेत. तर टी-20 मध्ये 24.70 च्या सरासरीने 10 विकेट घेतल्या आहेत. 2010 साली त्याने झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्याने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या