उन्हाच्या चटक्यापासून सुटका नाही; बुधवारपासून पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यात तीन दिवस उष्णतेची लाट असण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. त्यानुसार राज्यात आणि विदर्भात तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. त्यामुळे उष्णतेमुळ काहिली होत आहे. तीन दिवसांनी उष्णतेची लाट ओसरल्यावर उष्णतेपासून दिलासा मिळेल, अशी शक्यता होती. मात्र, उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्याची शक्यता नाही. बुधवारपासून राज्यात पुन्हा तापमानवाढीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह राज्यात बुधवारपासून पुन्हा तापमानवाढीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील अनेक भागात तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमानात सातत्याने बदल होत आहेत. राज्यात तीन दिवस उष्णतेची लाट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच आता बुधवारपासून राज्यात पुन्हा तापमानवाढ होणार आहे.

अवकाळी पावसानंतर राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील अकोला शहरात झाली. राज्यात इतर जिल्ह्यातही तापमान 42 ते 44 अंशादरम्यान होते. सोमवारी तापमानात एक ते दोन अंशाची घट दिसून आली. त्यामुळे उष्णतेपासून सुटका होण्याची शक्यता असतानाच हवामान खात्याने तापमानवाढीचा इशारा दिला आहे.