1 / 10
काँग्रेस नेते शंकरराव चव्हाण हे 1975 व 1986 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. तर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांनी देखील दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन व त्यांचा मुलगा हेमंत सोरेन या दोघांनीही राज्याच्या मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.
एचडी देवेगौडा हे 1994 मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले होते तर त्यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी हे दोनदा मुख्यमंत्री झाले आहेत.
2000 पासून गेली 19 वर्ष ओडीशाचे मुख्यमंत्री पद भूषविणाऱ्या नवीन पटनायक यांचे वडिल बीजू पटनायक हे देखील 1990 मध्ये ओडीशाचे मुख्यमंत्री झाले होते.
आंध्र प्रदेशच्या विभाजनापूर्वी काँग्रेसचे राजशेखर रेड्डी हे राज्याचे मुख्यमंत्री होते मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा जगन मोहन रेड्डी याने वायएसआर काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्याच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या व जगनमोहन मुख्यमंत्री झाले
मध्य प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री रविशंकर शुक्ला यांचे पुत्र श्यामा चरण शुक्ला यांची देखील दोनदा मुख्यमंत्रीपदावर निवड झाली.
























































