मराठा आंदोलनादरम्यान उदगीरमध्ये हिंदू-मुस्लीम तणाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । उदगीर

मराठा आंदोलनानिमित्त बुधवारी पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर शहरात बंदचे आवाहन करणाऱ्या आंदोलकांना भाजी मार्केटमध्ये मुस्लीम टोळक्याने घेरून धक्काबुक्की आणि मारहाण केली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप केला, मात्र हुल्लडबाज मुस्लीम टोळक्यावर कारवाई न करता, उलट लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या हिंदू तरुणांवरच लाठीचार्ज केला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्येनंतर बुधवारी मराठा क्रांती ठोक मोर्चेकऱ्यांनी महाराष्ट्र बंदचा नारा दिला होता. या दरम्यान उदगीरमध्ये भाजी मार्केट परिसरात बंदचे अवाहन करणारे कार्यकर्ते व एका फळ गाडीवाल्याचा वाद झाला. त्याच्या समर्थनार्थ इतर मुस्लीम दुकानदार रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हिंदू युवकांना मारहाण केली. वादाचे पर्यवसन हिंदू – मुस्लिम दंग्यात होऊ नये म्हणून पोलिसांनी हस्तक्षेप केला. मात्र पोलिसांनी हिंदू तरुणांनाच बेदम मारहाण केल्याने मराठा मोर्चा आंदोलकांनी पोलिसांचा निषेध केला आहे.