समुद्रामार्गे पाकिस्तान करू शकतो हल्ला, नौदल हाय अलर्टवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

जम्मू कश्मीरमधील 370 कलम रद्द केल्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी हिंदुस्थानवर हल्ला करण्याचा कट रचला आहे. दहशतवादी यावेळेस समुद्रा मार्गे हल्ला करू शकतात असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला असून त्यामुळे समुद्री भागात हाय अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे नौदलाला देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हिंदुस्थानच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील दोन्ही किनारपट्टींवरून हल्लाचा धोका आहे त्यामुळे या दोन्ही किनारपट्टींवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे, असे हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी जैश ए-मोहम्मदचे 100 हून अधिक दहशतवादी हिंदुस्थानात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा दिला होता. या दहशतवाद्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याचा भाऊ इब्राहिम अजहरचा देखील समावेश आहे.