मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला

manipur

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळून आला असताना आणि जिरीबाम जिह्यात तणाव वाढला असताना आज मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षकांना गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले. दोघांनाही तत्काळ इंफाळच्या शिजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री हिंसाचारग्रस्त जिरीबाम जिह्याच्या दौऱ्यावर जाणार होते. त्याआधी तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या अतिरिक्त सुरक्षा पथकावर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.