
सामना ऑनलाईन । श्रीनगर
जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिह्यात एका पोलीस ठाण्यावर आज दहशतवाद्यांनी हल्ला केला. सायंकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी अचानक ग्रेनेड टाकल्याने सात नागरिक जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या दोन दिवसांत पुलकामात हा तिसरा हल्ला आहे.
सज्जाद भटचा खात्मा
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक सूत्रधार सज्जाद भट याचा मंगळवारी सुरक्षा बलाच्या जवानांनी चकमकीत खात्मा केला. याशिवाय एका दहशतवाद्यालाही यमसदनी धाडण्यात आले. चकमकीत एक जवानदेखील शहीद झाला. जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग जिह्यातील मरहामा परिसरात मंगळवारी सकाळी ही चकमक उडाली.



























































