श्रीलंकेतील आत्मघातकी हल्लेखोर कॅमेर्‍यात कैद, व्हिडीओ व्हायरल

सामना ऑनलाईन । कोलंबो

श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 321 जणांचा मृत्यू झाला होता. तर 500 हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्यातील आत्मघातकी हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. स्फोटकं घेऊन चर्चकडे जाताना त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

इस्टर डेच्या दिवशी एका दहशतवाद्याने चर्चमध्ये आत्मघातकी हल्ला केला. या दहशतवादी चर्चमध्ये जातानाचे दृश सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एक अतिरेकी स्फोटकांनी भरलेली बॅग आपल्या पाठीवर घेऊन जात आहे. हा अतिरेकी एका व्यक्तीशी चर्ची विचारणा करत आहे. नंतर बॅग घेऊन तो चर्चकडे जाताना दिसत आहे. त्यानंतर या अतिरेक्याने हा आत्मघातकी हल्ला घडवला आहे.

सदर हल्ल्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसने घेतली आहे. तसेच अमेरिकेच्या मित्रपक्षाला आम्ही टार्गेट करणार असेही इसिसने म्हटले आहे.