तहरीक-उल-मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला कंठस्नान

12

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमधील पुलवामामध्ये तहरीक-उल-मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात हिंदुस्थानच्या जवानांना यश आले आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या संयुक्त कारवाईत हा दहशतवादी मारला गेला. सुरक्षा यंत्रणांना या परिसरात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यामुळे या परिसराला चारही बाजूने घेरण्यात आले.  दहशतवाद्याला याची चाहूल लागताच त्याने गोळीबार सुरू केला. यावेळी झालेल्या चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.

ठार केलेल्या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. हा दहशतवादी काही दिवसांपुर्वी बारामुल्ला येथे पोलिसांच्या गाडीवर ग्रॅनेड हल्ल्यातील आरोपी होता. तेव्हापासून जम्मू-कश्मीर पोलीस आणि हिंदुस्थानचे जवान त्याच्या मागावर होते.

आपली प्रतिक्रिया द्या