टीईटी आणि म्हाडा परीक्षा घोटाळ्यातील तीन दलालांना बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरक्यकहारासह म्हाडा पेपर फुटीप्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी आणखी तीन दलालांना अटक केली आहे. संबंधित एजंटांनी उमेदवारांकडून कोटय़वधींची माया गोळा करून वाटून घेतल्याचे  उघडकीस आले आहे. सायबर पथकांनी नाशिक, बुलढाणा, लातूर परिसरात छापे मारून दलालांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे टीईटीसह म्हाडा पेपर फुटीप्रकरणातील आणखीन आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येणार आहे.

मुकुंदा जगन्नाथ सूर्यवंशी (वय 33, रा. नाशिक), कलीम गुलफेर खान (वय 52, रा. बुलढाणा), जमाल इब्राहिम पठाण (वय 40, रा. लातूर) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. टीईटी 2018 मध्ये आरोपी मुकुंदा याने अपात्र उमेदवारांना पात्र करण्याचे आमिष दाखवून तब्बल 80 लाख रुपये एजंट हरकळ बंधूंना दिल्याचे सांगितले. त्याशिवाय टीईटी 2019 परीक्षेत 1 कोटींवर रक्कम पोहोच केल्याचे पोलिसांना सांगितले आहे.