
टीईटी परीक्षा पेपरफुटीप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या १२ आरोपींची रवानगी पुन्हा पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य तीन आरोपींसोबत या आरोपींची एकत्र चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे अर्ज केल्यानंतर न्यायालयाने या १२ आरोपींची रवानगी येत्या ३ ऑगस्टपर्यंत पुन्हा पोलीस कोठडीत केली आहे.
भिवंडीतील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. घोडके यांच्या न्यायालयात आज न्यायालयीन कोठडीतील १२ व पोलीस कोठडीतील २ अशा एकूण १४ आरोपींना हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायाधीशांनी पोलिसांच्या मागणीनुसार १२ आरोपींची रवानगी पुन्हा पोलीस कोठडीत केली असल्याची माहिती आरोपींचे वकील ॲड. नारायण अय्यर यांनी दिली आहे.































































