वर्ल्डकपपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, ‘स्टेन गन’ दुखापतीमुळे बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला तगडा धक्का बसला आहे. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन जखमी झाला आहे. त्यामुळे तो सुरुवातीच्या दोन लढतीला मुकणार आहे. आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्जन यांनी ही माहिती दिली आहे.

आयपीएलमध्ये डेल स्टेन रॉय चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सदस्य होता. या दरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो फक्त दोन लढतीनंतर मायदेशी परतला होता. स्टेन अद्यापही त्या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे वर्ल्डकपमधील सुरुवातीच्या लढतींना तो मुकेल असेल आफ्रिकेचे प्रशिक्षक ओटिस गिब्जन म्हटले आहे.

वर्ल्डकपचा उद्घाटनाचा सामना दक्षिण आफ्रिका आणि यजमान इंग्लंडमध्ये रंगणार आहे. या लढतीत आणि त्यानंतर रविवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या लढतीला स्टेन मुकणार आहे. 5 जूनला आफ्रिकेचा संघ हिंदुस्थानला भिडणार आहे. या लढतीत स्टेनचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.