पैसे देऊन महिलांसोबत मारायचा मौज, बायकोने रंगेहात पकडल्यानंतर अशी झाली अवस्था

प्रातिनिधिक फोटो

थायलंडमध्ये एका महिलेने आपल्या नवऱ्याला सेक्स वर्करसोबत पकडले आणि त्यानंतर तिने जे केले त्यानंतर हा सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

ही घटना थायलंडच्या फुकेत येथील आहे. महिलेला आपल्या नवऱ्यावर संशय आला. त्यामुळे महिलेने नवऱ्याचा गुपचूप फोन तपासला असता तिला त्याच्याकडे सेक्स वर्करचे फोटो दिसले आणि तिला पायाखालची जमिन सरकली . तिने त्यानंतर नवरा बाहेर जात असताना तिने त्याचा पाठलाग केला आणि त्याला रंगेहात पकडले. त्यानंतर महिलेने त्या सेक्स वर्करला इतके मारले की तिला अखेर पोलीसांना फोन करावा लागला आणि पोलीस आल्यानंतर तिची सुटका झाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, महिलेच्या नवऱ्याला आधीच कळले होते की बायकोला आपल्यावर संशय आला. त्यामुळे खोलीत पत्नी येण्याआधीच त्याने तिथून पोबारा केला. डेली स्टार वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, तिथे उपस्थित असलेल्या अन्य लोकांनी पोलिसांनी याप्रकरणी माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत ती महिला सेक्स वर्करला मारत राहिली. याप्रकरणी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल.