
सामना प्रतिनिधी । मुंबई
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा खेळ समिट’च्या दुसर्या पर्वाला दणदणीत प्रतिसाद लाभला. 350 महाविद्यालयांतील 6500 युवा खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला. कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयाने तीन सुवर्ण, दोन रौप्य पदकांसह एकूण 16 पदकांवर मोहोर उमटवत अव्वल क्रमांकावर झेप घेतली.
युवासेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवात 15 खेळांच्या शर्यती रंगल्या. विद्याविहारमधील के. जे. सोमय्या महविद्यालयाने दोन सुवर्ण, दोन रौप्य पदकांसह एकूण 14 पदकांची कमाई करताना दुसरा क्रमांक पटकावला. बंटस् महाविद्यालय (चेंबूर), गुरुनानक महाविद्यालय (खालसा), पाटकर विद्यालय (गोरेगाव) यांनी अनुक्रमे तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक पटकावत आपले वर्चस्व दाखवले.


























































