एटीएम फोडून चोरी करणाऱ्याला उरण पोलिसांकडून शिताफीने अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बँक ऑफ इंडीया उरणचे एटीएम फोडून चोरी करणाऱ्या इसमास उरण पोलिसांनी शिताफीने पकडून अटक केली आहे. गुरूवार रात्री दोनच्या सुमारास पोलीस शिपाई संतोष चांगदेव जगदाळे यांना ठाणे अंमलदार मदतनीस म्हणुन कर्तव्यावर असताना त्यांना बातमी मिळाली की, गांधी चौक उरण येथील बँक ऑफ इंटीया एटीएम चे शटर अर्धवट उघडया स्थितीत असून आत काहीतरी प्रकार घडत आहे. त्यांनी सदर माहीती गस्तीवर असलेल्या सहा पोलीस निरीक्षक वृषाली पवार यांना दिली व गस्ती वरिल बिट मार्शल रतन राठोड, पोलिस शिपाई दाहिजे,  निलेश ठाकुर यांना कळविली.  तेथे पोहवल्या पाहीले असता एटीएम मशीनची तोडफोड होउन अस्थव्यस्थ पडलेले स्थितीत होते. त्याच वेळेला केबिनमध्ये लपलेल्या एका इसमाने प्रतिकार करून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याच्या तोंडाला रुमाल आणि हातात ग्राईंडर मशिन  होता. तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पकडले. आरोपीचे नाव विक्रांत प्रकाश मोकल असे आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.