ब्रेकिंग – ठाण्यातील भाजप नगरसेवकाला खंडणी प्रकरणी अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ठाण्यातील भाजप नगरसेवक नारायण पवार यांना खंडणी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. कासारवडवली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नगरसेवक नारायण पवार यांना न्यायालयात हजार केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, तीन कोटींच्या खंडणी प्रकरणात फरारी असलेले ठाणे महापालिकेतील भाजपचे गटनेते नारायण पवार यांना सोमवारी पोलिसांनी अटक केली. 2015 मधील हे खंडणी प्रकरण असून पवार यांच्यासह एकूण 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. कासारवडवली पोलिसांनी पवार यांना अटक केले असून न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.