ठाण्याच्या महापौरांनी भाजपला खडखडवले; तुमची सत्ता असलेल्या महापालिकेत कोणता, किती टॅक्स माफ झाला?

1371

तब्बल सहा महिन्यांनंतर मंगळवारी झालेल्या ऑनलाइन महासभेत भाजपच्या नगरसेवकांनी ‘गोंधळात गोंधळ’चा प्रयोग रंगवण्याचा प्रयत्न केला.पण महापौर नरेश म्हस्के यांनी हा प्रयोग त्यांच्यावरच उलटवला. कोरोना संकटाचे निमित्त करून पाणीपट्टी व मालमत्ता कर माफ करण्याची मागणी करणाऱया भाजपच्या नगरसेवकांना चांगलेच खडखडवले. तुमची सत्ता असलेल्या पुणे, कोल्हापूर तसेच नागपूर  महापालिकांमध्ये कोणता टॅक्स किती माफ झाला हे आधी सांगा आणि मगच महासभेत मागणी करा, असे सांगताच भाजपच्या सर्व नगरसेवकांची बोलती बंद झाली.

कोरोनाच्या काळात संपूर्ण प्रशासन एका योद्धय़ाप्रमाणे काम करीत होते. त्यामुळे पालिकेची महासभा होऊ शकली नाही. मात्र जानेवारी, फेब्रुवारी व मार्चची खंडित महासभा मगळवारी ऑनलाइन पद्धतीने पार पडली. आदल्या दिवशी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत सर्वांना महवाच्या सूचनादेखील देण्यात आल्या होत्या. ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचे तातडीचे प्रश्न आधी मार्गी लावण्याचे ठरले होते. पण प्रत्यक्षात महासभेत भाजपच्या नगरसेवकांनी विनाकारण गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

कोरोनाचे राजकारण बंद करा!

गटनेत्याचेही भाजपचे नगरसेवक ऐकत नव्हते. त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वॉर्डांमध्ये अनेक कामे करायची आहेत. असे तुम्हीच सांगता. मग मालमत्ता कर आणि घरपट्टी कर माफ करून ही कामे कशी करणार, असा सवाल महापौरांनी केला. तसेच कोरोनाचे राजकारण करून  ठाणे महापालिकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका, असे आव्हान महापौर म्हस्के यांनी महासभेत भाजपच्या नगरसेवकांना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या