ठाणे पालिका उपायुक्तांकडून खंडणी उकळणाऱ्या त्रिकुटाविरोधात गुन्हा

ठाणे पालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याकडून तीन लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी त्रिकुटाविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

ठाणे महापालिकेचे बाळकुम येथे ग्लोबल कोविड रुग्णालय असून पालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर मागील वर्षभरापासून रुग्णालयाचा कारभार सांभाळत होते. यादरम्यान एका महिलेने त्यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र ही तक्रार खोटी असल्याचे सांगत संबंधित महिला, बिनु वर्गिस आणि नाझीया सय्यद या तिघांविरोधात केळकर यांनी खंडणीची तक्रार दाखल केली आहे. या तिघांनी माझ्याकडून तीन लाख रुपये उकळले, असे केळकर यांचे म्हणणे आहे. गेल्याच आठवडय़ात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात बिनु वर्गिस याचे नाव असून नाझीया सय्यद ही महिला एका इंग्रजी वृत्तपत्राची माजी पत्रकार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या