
सामना प्रतिनिधी । ठाणे
कचऱ्यातून खत निर्मिती, वीज, इंधन निर्मिती असे अनेक प्रयोग ठाण्यात सुरू आहेत. पण आता कचऱयाचे सोने बनवण्याची अनोखी संधी ठाणेकरांना मिळणार आहे. ठाणे महापालिका ही संधी देणार आहे. त्यासाठी तुम्हाला फार काही नाही तर फक्त पालिकेने सार्वजनिक ठिकाणी उभारलेल्या अत्याधुनिक टेकबीनमध्ये नियमित कचरा टाकायचा आहे. टेकबीन कचरा टाका सोने जिंका अशी भन्नाट योजना प्रशासनाने सुरू केली असून भाग्यवान विजेत्याला सोन्याचे नाणे देण्यात येणार आहे. इतकेच नव्हेतर या कचरा पेटीचा जास्तीत जास्त नियमितपणे वापर करणाऱयांना अनेक कंपन्याच्या वेगवेगळ्या ऑफर्सदेखील मिळणार आहेत.
स्वच्छ आणि सुंदर ठाणे ही संकल्पाना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी महापालिका सार्वजनिक ठिकाणी २०० अत्याधुनिक टेकबीन कचरा पेटय़ा उभारणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात बसवण्यात आलेल्या शंभर टेकबीन कचरा पेट्यांचे जागतिक पर्यावरण दिनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते लोकार्पण झाले. तीन फूट जागेत उभारण्यात येणाऱया या टेकबीनमध्ये ओला व सुका कचरा टाकण्यासाठी दोन कप्पे आहेत. टेकबीन आधुनिक कचरापेटीतील (techbin) कचरा साठवणुकीची मुख्य पिशवी भरल्यावर सदर पिशवी काढून मोठय़ा कचरापेटीत किंवा कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीत ते टाकण्यात येईल अशी व्यवस्था आहे.
असे होणार सोने
ठाणे महानगरपालिकेच्या टेकबीनच्या माध्यमातून ‘कचरा टाका आणि सोने जिंका’ अशी आगळीवेगळी योजना सुरू केली आहे. नागरिकांना गुगल प्ले स्टोअरवर जाऊन टेकबीन हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. या अॅपवर नागरिकांना जवळचे टेकबीन कोठे आहे याची माहिती मिळेल. त्यानंतर टेकबीनमध्ये कचरा टाकल्याकर एल.ई.डी. स्क्रीनवर आलेल्या कोडचा अॅपमधील किन टब कॅमेऱयाने फोटो काढून हा कोड टेकबीनच्या सर्व्हरला पाठवायचा आहे. त्यानंतर आपण या टेकबीनचा वापर करत असल्याची नोंद केली जाणार आहे. त्यातून टेकबीन वापरणाऱया ठाणेकरांमधून निवडण्यात येणाऱया भाग्यवान विजेत्यांना सोन्याचे नाणे बक्षीस रूपात पालिका देणार आहे.
जाहिरातीतून खर्च
या अत्याधुनिक कचरापेटय़ांसाठी महापालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. या आधुनिक कचरापेटय़ा तयार करणे व नियमित वापरण्याचा खर्च (capex &opex) पेटय़ावर प्रदर्शित करण्यात येणाऱया जाहिरातींच्या माध्यमातून भागवता येणार आहे. या कामाची संपूर्ण जबाबदारी ces ASSIAN GALLANT LLP यांची असेल. तसेच जाहिरातीचे सर्व अधिकार सदर संस्थेकडे राहणार आहेत.



























































