अधिकाऱ्यांचा तीन दिवस पालिका मुख्यालयातच मुक्काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाणे-मुंबईसह राज्यात येत्या ८ ते १० जून रोजी जोरदार पावसाच्या सरी बसणार आहेत. कदाचित २६ जुलै २००५ ची परिस्थितीदेखील यामुळे ओढावू शकणार आहे. स्कायमेट आणि हवामान खात्याने हा इशारा दिला असून तो खरा ठरल्यास पूरपरिस्थितीशी दोन हात करण्यासाठी ठाणे महापालिकेचे आपत्ती निवारण विभाग सज्ज झाले आहे. तब्बल १८ अधिकाऱ्यांचा पूरपरिस्थितीवर करडी नजर राहणार आहे. इतकेच नव्हे तर या अधिकाऱयांसह पालिकेच्या सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून ९, १० आणि ११ जूनला मुख्यालय न सोडण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

ठाणेकरांना पावसाळ्यात पूरपरिस्थितीचा सामना करावा लागू नये यासाठी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र २००५ सारखा प्रसंग दुर्दैवाने ओढावलाच तर त्याच्याशी सामना करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. त्याचा प्रत्यय दोन दिवसांतच येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी मंगळवारी रात्री उशिरा सर्व पदाधिकाऱयांची तातडीची बैठक घेऊन सतर्क राहण्याचे आदेश दिले. या कालाकधीत सर्क अधिकाऱयांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून त्यांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेशही दिले आहेत. ७२ तासांच्या कालाकधीत १८ वरिष्ठ अधिकाऱ्यांची तीन शिफ्टमध्ये कंट्रोल रूममध्ये २४ तासांची डय़ुटी लावण्यात आली आहे.

– शहरात ज्या सखल भागात पाणी साचते त्या ठिकाणी लोखंडी पोल टाकून रस्सी बांधण्यात येणार आहे. त्यामुळे एखादी घटना घडून त्या ठिकाणी कोणी अडकले तर त्याला क्यकस्थितपणे सुरक्षितस्थळी हलकिण्यात येऊ शकेल.

– सखल भागातील रहिवाशांचे स्थलांतर करण्याच्या सूचनादेखील त्यांनी केल्या आहेत. त्यासाठी स्थावर मालमत्ता विभाग महापालिकेच्या रिकाम्या इमारती उपलब्ध करून देणार आहे.

– महापालिका शाळा आणि वेळ पडल्यास लग्नाचे हॉलही आरक्षित करण्याच्या सूचनाही पालिका आयुक्तांनी अधिकाऱयांना दिल्या आहेत.

शिवसैनिक अॅलर्ट
हवामान खात्याने तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असतानाच ठाण्यातील शिवसैनिकही अॅलर्ट झाले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रातील शाळा, समाज मंदिरे तसेच शिवसेनेच्या शाखांमध्ये विशेष काळजी घेण्यात येणार असून एखादी दुर्घटना घडल्यास शिवसैनिकांची टीम घटनास्थळी धाव घेऊन त्वरित मदकार्य सुरू करणार आहे. पाणी, जेवण तसेच अन्य साहित्याचीही मदत करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.