
ठाणे आणि नवी मुंबई शहराचा वीज पुरवठा गेल्या दीड तासांपासून खंडीत झाला आहे. खारेगाव कळवा सबस्टेशनची लाईन ट्रीप झाल्याने दोन्ही शहरांचा वीज पुरवठा बंद झाला आहे. भर दुपारी वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. महावितरण सध्या वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.


























































